नमस्कार मित्रानों, "न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग" हा विषय फारसा परिचित नाही पण आपल्या मनाला समजून घेण्यासाठी खूप महत्वाचा आहे. आपल्याला कळतंय की आपण पॉझिटिव्ह थिंकिंग करायला पाहिजे पण तरीही आपण निगेटिव्ह थिंकिंग करतो, आपल्याला कळतंय की आपल्या चुकीच्या सवयीमुळे आपलं नुकसान व्हायलय तरीदेखील आपण ती सवय आपण सोडत नाही, आपल्याला कळतंय की आपण चिडचिड करू नये तरीदेखील आपण चिडचिड करतो, आपण लहानपणापासून ऎकत आलोय की "कळतंय पण वळत नाही", कळूनदेखील पण का वळत नाही? हे जाणून घेण्यासाठी आपल्याला "आपलं मन कसं काम करतं" हे समजून घेणं गरजेचं आहे. हे न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग (NLP) द्वारे आपण समजून घेऊया.
बऱ्याच सेल्फ डेव्हलपमेंट च्या पुस्तकात आपण वाचतो, की आपण पॉझिटिव्ह थिंकिंग करायला पाहिजे, निगेटिव्ह थिंकिंग करू नये, निगेटिव्ह विचार आले तर त्याकडे दुर्लक्ष करून पॉझिटिव्ह थिंकिंग कडे लक्ष द्यावं. असं काही ठिकाणी शक्य आहे पण प्रत्येक ठिकाणी नाही. जिथे हे शक्य आहे तिथे नक्की करा पण जिथे शक्य नाही तिथे काय करायचं हे समजून घेऊया.
काही वेळा आपण निगेटिव्ह विचारांकडे दुर्लक्ष करून पॉझिटिव्ह विचार करतो तेव्हा निगेटिव्ह विचार, संशय , भीती येते व आपल्या कार्यात अडथळा येतो कारण आपण त्या निगेटिव्ह विचारांकडे दुर्लक्ष करतोय. NLP ची एक पूर्वधारणा (Presupposition) आहे की "प्रत्येक वागणुकीच्या मागे भावना ही पॉझिटिव्ह असते" (Every behavior has a positive intention.) काही Behavior हे पॉझिटिव्ह असतात व काही निगेटिव्ह, पण या दोन्ही Behavior मागील भावना ही पॉझिटिव्ह असते.
जस की एखादी व्यक्ती मंदिरात जात आहे, त्यामागे त्याच Intention आहे की मला मनशांती मिळावी. एक माणूस त्याच्या ऑफीस मध्ये मन लावून काम करतोय, एक आई तिच्या बाळाला जेऊ घालतेय हे सर्व पॉझिटिव्ह Behaviors आहेत व या Behavior मागील Intention पण पॉझिटिव्ह आहे.
पण काही निगेटिव्ह Behaviors आहेत त्यामागे देखील Intention पॉझिटिव्ह असते, जसं की एक माणूस सिगरेट पितोय, त्याचं हे Behaviour निगेटिव्ह आहे, पण त्यामागे त्या व्यक्तीचं Intention पॉझिटिव्ह आहे की त्याच्या मनात विचारांची उलथापालथ चालू आहे तो तणावाखाली आहें, सिगारेट पिल्याने तणाव कमी होऊन मनशांती मिळते. एक वडील मुलाला मारत आहेत हे Behavior जरी निगेटिव्ह असलं तरी त्यामागील Intention हे पॉझिटिव्ह आहे की मुलाने त्याची चूक सुधारावी, त्याच्यात सुधारणा व्हावी. आतंकवादी लोकांची हत्या करतात ह्या Behavior मागे आतंकवाद्याचं Intention हे पॉझिटिव्ह आहे, त्याच ब्रेन वॉश केलय की आपण हे खूप पुण्याचं काम करतोय ह्यातून त्यांना स्वर्ग मिळेल.
माझ्याकड़े काही महिन्यापूर्वी एक व्यक्ती आले होते त्यांचा प्रॉब्लेम होता की, ते दिवसातील ५-६ तास मोबाईल वर व्हास्ट्सअँप फेसबुक वापरात होते, ते सांगत होते की त्यांचा वेळ खुप वाया जातोय काम वेळेवर होत नाहीयेत. त्यांचं हे जे Behaviour आहे याचा हे खूप तिरस्कार करत होते. तुम्ही जर तुमच्या वाईट सवयींचा तिरस्कार करीत असाल तर त्यातून मुक्त होणे आणखी अवघड होईल. सर्वप्रथम त्यामागील Positive Intention हुडकणे गरजेचं आहे त्यांचे काउंन्सलींग केल्यावर लक्षात आलं की, त्यांच्या जीवनात काही महिन्यापूर्वी एक पारिवारिक समस्या आली होती. तेव्हापासून हि सवय लागली होती, ती समस्या तर सुटत नव्हती मनात विचारांचा गुंता झालेला होता. त्याचा खूप मानसिक त्रास त्यांना होत होता, मोबाईलवर फेसबुक व्हॅट्सअँप वापरल्याने तात्पुरतं का होईना त्यांना त्या विचारांपासून सुटका होत होती, हे त्यामागील Positive Intention होतं. तर पहिला तो फॅमिली चा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला व नंतर मग या सवयीतून मुक्त होणे सोपे झाले. तर आपण आपले कोणते अनावश्यक Behaviour / सवय सोडू इच्छिता त्यामागे कोणते पॉजिटीव्ह इंटेंशन आहे हे जाणून घेतल्याने ते बदलणे सोपे होईल.
NLP शिकून आपण आपण आपल्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणू शकतो. NLP आपल्या जीवनात नेमकी काय मदत करू शकते हे आपण खालील मुद्द्यान्द्वारे पाहुया.
1. ध्येयावर लक्ष केंद्रित कसे करावे?
2. भूतकाळातील दुःखद आठवणींचा प्रभाव कमी कसा करावा?
3. आपल्याला निगेटिव्ह विचार का येतात ? त्यावर उपाय काय ?
4. राग कमी कसा करावा ?
5. अनावश्यक भीती (मृत्यूची भीती, एखाद्या व्यक्तीची, घटनेची) भीती कशी घालवावी ?
6. जुन्या अनावश्यक सवयी कशा सोडव्यात ?
7. स्ट्रेस मैनेजमेंट कसे करावें ?
8. स्वतःवर नियंत्रण कसे ठेवावे?
9. आपली मनःस्थिती चांगली कशी ठेवावी ?
10. नातेसंबंध चांगले करण्यासाठी काय करावे ?
आपण आजपर्यंत जे करत आलोय तेच करत राहिलो तर आपल्याला तेच मिळेल जे आजपर्यंत मिळत आलयं, जर आपल्याला आपल्या जीवनात नवीन काही हवं असेल तर नवीन कृती करणे गरजेचे आहे. तर न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग चा हा एक छोटासा भाग आपण या लेखात समजला. ज्यांना आणखी सविस्तर NLP शिकायची इच्छा आहे ते 9421478741 या नंबरवर फोन करून शकता.
सुयश पुकाळे ट्रैनिंग & कंस्लटन्सी
२ रा मजला, मेहता टॉवर, शिवाजी चौक, सोलापूर.
संपर्क :- 9421478741
नाव: सुयश पुकाळे
शिक्षण: B.Com, M.B.A.(Finance)
コメント